
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुकीत राधानगरी, भुदरगड व चंदगडमध्ये महायुतीतच जागा वाटपावरून संघर्षाची चिन्हे आहेत. अन्य नऊ तालुक्यांत युती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गट - गणांसह प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर या निवडणुकींच्या घडामोडीला अधिक वेग येणार आहे. त्यामुळेच पक्षातील ‘इनकमिंग’ आणि ‘आउटगोईंग’ ही थांबल्याचे चित्र आहे.