esakal | लॉकडाऊन उठले, चेन स्नॅचरांचेही फावले
sakal

बोलून बातमी शोधा

The lockdown woke up, the chain snatchers too

जवाहरनगरातील शाहू सेना चौकात आज दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. अष्टपैलू मण्याची आठ ग्रॅमची ही चेन असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. याबाबतची फिर्याद रात्री आठच्या सुमारास कल्पना चंद्रकांत घाटगे (वय 53,रा.सुभाषनगर) यांनी दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

लॉकडाऊन उठले, चेन स्नॅचरांचेही फावले

sakal_logo
By
राजेश मोरे

कोल्हापूर ः जवाहरनगरातील शाहू सेना चौकात आज दुपारी साडेचारच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी हिसकावून पोबारा केला. अष्टपैलू मण्याची आठ ग्रॅमची ही चेन असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे. याबाबतची फिर्याद रात्री आठच्या सुमारास कल्पना चंद्रकांत घाटगे (वय 53,रा.सुभाषनगर) यांनी दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी घाटगे खासगी नोकरी करतात. काम संपवून दुपारी चारच्या सुमारास घरी जात असताना पांढऱ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी घाटगे यांच्या गळ्यातील सोन्याची आठ ग्रॅमची अष्टपैलू मण्याची माळ हिसडा मारून ते जवाहरनगराकडे निघून गेले. दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुमारे दहा हजार रुपयांची ही चेन असल्याची नोंद पोलिसांच्या डायरीवर आली. संशयितांनी अंगात फिकट ऑरेंज रंगाचा शर्ट, निळसर रंगाची जीन्स्‌ तर दुसऱ्याने लाल रंगाचा पट्ट्यापट्ट्याचा शर्ट व नीळसर रंगाजी जीन्स्‌ घातली असल्याचे वर्णन फिर्यादीने केले आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार पोलिसांनी भागातील सीसीटीव्हीसह इतर चौकशी तातडीने सुरू केली. सहाय्यक फौजदार डी. ठोंबरे अधिक तपास करीत आहेत.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top