
Gold Robbery
esakal
Robbers Vehicle Crashes : चडचण (जि. विजयपूर, कर्नाटक) येथील स्टेट बँक शाखेवर मंगळवारी टाकलेल्या दरोड्यात २० किलो सोन्यासह सुमारे २४ कोटींचा ऐवज लुटला. या लुटीतील दरोडेखोरांची एक गाडी अपघातग्रस्त झाली. नागरिकांशी वाद सुरू असताना पोलिस तिथे दाखल झाले. त्यात या लुटीतील दोन किलो सोने व १.४ कोटींची रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला.