इचलकरंजीत 10 हजार यंत्रमागधारकांना मिळणार वेळेत पेमेंट 

machine owners will get payment on time
machine owners will get payment on time

इचलकरंजी : शहरात यंत्रमाग व्यवसायात कापड पेमेंटधारा नव्याने तयार करण्यात येत असून ते न पाळणाऱ्या व्यापाऱ्यावर शहरातील यंत्रमागधारकांनी संयुक्तपणे बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसात नव्या पेमेंटधारावर शिक्कामोर्तब होणार असून पुढील महिन्यापासून ही पेमेंटधारा अंमलबजावणीत येणार असल्याचे समजते. कापड उद्योगातील या नव्या पद्धतीमुळे शहरातील 10 हजार यंत्रमागधारकांना कापडाचे पैसे वेळेत मिळण्याबरोबरच त्यांचे उत्पादनही सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. 

शहरात विविध प्रकारचे कापड उत्पादीत होते. कापडाच्या प्रकारानुसार शहरात पेमेंटधारा निश्‍चित आहे. यंत्रमागधारकांनी कापड तयार केल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याचे पैसे किती दिवसांनी घ्यायचे हे पेमेंटधारामध्ये निश्‍चित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या पध्दतीनुसार उत्पादकाने व्यापाऱ्याला कापड दिल्यानंतर त्याची रक्कम तीन दिवसापासून ते दीडशे दिवसानंतर मिळत होती. यातूनच शहरात अनेक व्यापाऱ्यांनी दिवाळ काढण्याचा प्रकार केला आहे. या प्रकारात कापड घेतलेल्या यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. 

दुसऱ्या बाजूस मोठ्या प्रमाणात कापड खरेदी करून पळून जाण्याचा प्रकारही यापूर्वी अनेकवेळा घडला आहे. शहरात असलेली पेमेंटधारा पद्धत राज्यात नव्हे तर देशात कोणत्याच कापड उत्पादन करणाऱ्या भागामध्ये नाही. त्यामुळे इचलकरंजीत सुरू असलेली ही अनिष्ठ प्रथा मोडून काढण्यासाठी शहरातील सर्व यंत्रमागधारक संघटना एकत्र येऊन गेली पंधरा दिवस याबाबत आराखडा करत होते. आता हा आराखडा निश्‍चित झाला असून त्यावर सोमवारी अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. नव्या आराखड्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता कापडाची पेमेंटधारा मोडणाऱ्या संबंधीत व्यापाऱ्याचे नाव जाहीर करून त्याच्याशी कोणीही व्यवहार करू नये यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. 

अशी आहे सध्याची पेमेंटधारा 
* पॉपलीन कापड- 3 दिवस 
* केंब्रिक कापड- 10 ते 12 दिवस 
* मलमल कापड- 80 ते 100 दिवस 
* धोती कापड -100 ते 120 दिवस 
* पीव्हीपीसी -90 ते 100 दिवस 
* ऍटोलूमवरील कापड- 120 ते 150 दिवस 

टप्याटप्याने कारवाई.. 
पेमेंटधाराबाबत सर्व संघटना तसेच कापड दलाल यांच्यात एकमत झाले आहे. याबाबत झालेला निर्णय हा सर्व कापड व्यापारी, दलाल व यंत्रमागधारकांना बंधनकारक असणार आहे. कोणी नियम मोडल्यास पहिल्या टप्यात समज देण्यात येईल त्यानंतरही चुक झाल्यास दंड आणि सुधारणा झालीच नाही तर बहिष्कार टाकून नावे जाहीर करण्यात येणार आहेत. 

दृष्टिक्षेप 
- पुढील महिन्यापासून अमलबजावणी 
- नियम न पाळल्यास व्यापाऱ्यावर बहिष्कार 
- दहा हजार यंत्रमागधारकांना वेळेवर पैसे मिळणार 
- उत्पादनही सुरक्षित राहण्यास मदत 

कोल्हापूर

कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com