Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Madhuri Elephant Returns to Nandani After 400 Days : ४०० दिवसांनंतर माधुरी हत्तीण ११६० किमीचा प्रवास करून नांदणी मठात परतली. हजारो नागरिकांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भावनिक वातावरणात तिचे जल्लोषात स्वागत केले.
Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur

Madhuri’s 1,160 Km Journey From Vantara to Kolhapur

esakal

Updated on

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची बहुचर्चित माधुरी हत्तीण (ता.१२) मध्यरात्री १२.४० वाजता ११६० किमीचा प्रवास करून गावात पोहोचली आणि ‘माधुरी’प्रेमींकडून जल्लोष साजरा करताना अनेकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे वाहनांच्या ताफ्यातून आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात माधुरीची तब्बल चारशे दिवसांनंतर नांदणी गावात दिमाखदार स्वागताने घरवापसी (Madhuri Elephant) झाली. यावेळी फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com