

Mahabhumi Portal
esakal
कुंडलिक पाटील
कुडित्रे: जमीन व्यवहार अधिक पारदर्शक, वेगवान आणि पूर्णपणे नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जमिनीचे नकाशे आणि मोजणीनंतर मिळणारी 'क' प्रत नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत २०२२ पासून जमीन मोजणी केल्यानंतर देण्यात येणारी 'क' प्रत तसेच 'डीजीमॅप' ही नवी डिजिटल सुविधा महाभूमी प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांना नकाशांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची किंवा तासनतास ताटकळत राहण्याची गरज भासणार नाही.