
Kolhapur News: कोल्हापुरातल्या नांदणी येथील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सोमवारी रात्री हत्तीणीला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर भावनिक झाला होता.