
Mahadevi Elephant Mumbai Meeting : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’ च्या घरवापसीबाबत मुंबई, दिल्लीत खलबते सुरू झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला असतानाच गुरुवारी (ता. ७) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘महादेवी’ पुन्हा नांदणीला परतावी, यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही शहा यांनी दिली.