Mahadevi Elephant PETA Controversy : नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील 'महादेवी हत्तीणी'ला गुजरातच्या वनतारा केंद्राकडं नुकतंच हस्तांतर करण्यात आलं आहे. २८ जुलै रोजी निघालेली महादेवी हत्तीण जामनगरच्या वनतारामध्ये बुधवारी (ता. ३०) पोहोचली. मात्र, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत व माजी खासदार राजू शेट्टी यांनीही (Raju Shetti) हा विषय लावून धरला आहे. त्यांनी थेट 'पेटा'वर आरोप केला आहे.