
Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी चार वर्षांत जवळपास १५०० दूध संस्था नव्याने वाढवल्या. एवढ्या दूध संस्था वाढल्या; पण प्रत्यक्षात दूध संकलनात वाढ झालेली नाही, उलट परजिल्ह्यातून, परराज्यातून दूध घ्यावे लागते. हीच का ‘गोकुळ’ची प्रगती, अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्तारूढ गटाला आज जाब विचारला. दरम्यान, आगामी ‘गोकुळ’ची निवडणूक समविचारी लोकांना घेऊन कोणत्याही परिस्थितीत लढवणार, असेही महाडिक यांनी ठामपणे सांगितले.