Rajaram Factory Election : 'राजाराम'च्या निवडणुकीत महादेव महाडिकांचा दणदणीत विजयी; 'यांना' दिलं श्रेय

mahadevrao mahadik  first reaction on winning rajaram factory election by 39 votes kolhapur politics
mahadevrao mahadik first reaction on winning rajaram factory election by 39 votes kolhapur politics

राजाराम साखर कारखाना निवडणूकीत महादेवराव महाडिक यांनी दमदार वियज मिळवला आहे. या यांच्या विजयानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या विजयानंतर कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या दणदणीत विजयानंतर महादेवराव महाडिक म्हणाले की, राजराम कारखान्याच्या निवडणूकीतील विजय हा कारखान्याच्या सर्वसामान्य सभासदांचा विजय आहे. प्रामाणिक राहिलेल्या सर्वांचा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. या विजयाचं सर्व श्रेय मी अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना देतो असेही महादेवराव महाडिक यावेळी म्हणाले. आजचा विजयमुळे कोल्हापूरच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असून जिल्ह्याचं राजकारण यामुळे बदलणार आहे असेही त्यांनी सांगितले.

mahadevrao mahadik  first reaction on winning rajaram factory election by 39 votes kolhapur politics
Rajaram Factory Election Result : कंडका पडला! सतेज पाटलांना मोठा दणका; महादेवराव महाडिक 'इतक्या' मतानं विजयी

महाडिकांकडे असलेली ताकद ही गोरगरीब जनतेची आहे. धनंजय महाडिक अमल महाडिक यांना पहिले सलामी द्या, मग बाकीचं पुढंच पुढं पाहू. ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहेत. मी फूकून उडवून टाकेन, असा इशाराही महादेव महाडिक यांनी विरोधकांना दिला आहे.

mahadevrao mahadik  first reaction on winning rajaram factory election by 39 votes kolhapur politics
Barsu Refinery News :…तर प्रोजेक्ट अडचणीत येईल; शरद पवारांची उद्योगमंत्री सामंतांशी चर्चा

दरम्यान संस्था गटातून महादेवराव महाडिक 39 मतानं विजयी झाले आहेत, तर विरोधी गटाचे सचिन पाटील यांना केवळ 44 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत 5 फेरी अखेर महाडिकांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. याचबरोबर संस्था कडातून महादेवराव महाडिक यांनी 84 मतं मिळवत आपला विजय निश्चित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com