
हसन मुश्रीफांनी डिबेंचर्सबाबत वक्तव्य केले, त्यावर महाडिक गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आले.
esakal
Kolhapur Politics : ‘जिल्हा सहकारी दूध संघावर (गोकुळ) डिबेंचरसाठी मोर्चा काढला होता, तो मुद्दा बाजूला ठेवून काल वसूबारसच्या कार्यक्रमात नेत्यांनी दिशाभूल करून मोर्चाला राजकीय रंग दिला. आमची डिबेंचरची मागणी आजही कायम आहे. त्यासाठी आम्ही दिवाळीनंतर संस्था, सभासदांची सभा घेणार आहे. सहकार विभागाकडे दाद मागणार आहे, प्रसंगी न्यायालयात जाणार आहे. डिबेंचरला आमचा विरोध नाही. गतवर्षीप्रमाणे डिबेंचर द्यावा आणि उर्वरित रक्कम आम्हाला परत करावी’, अशी मागणी असल्याचे माजी संचालक विश्वास जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.