Gram Panchayat Election Result : महाडिकांच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटील गटाचा सुफडा साफ

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झालंय.
Shiroli Gram Panchayat
Shiroli Gram Panchayatesakal
Updated on: 
Summary

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झालंय.

Kolhapur Gram Panchayat Election Result : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झालंय. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटानं सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत.

Shiroli Gram Panchayat
धक्कादायक निकाल; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी 'गुजरात'ला मिळवून दिलं यश, पण मुलीचं पॅनल झालं पराभूत

सरपंचपदासाठी पद्मजा कृष्णात करपे या 4 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या. शिरोली ग्रामपंचायतीसाठी सत्ताधारी शाहू स्वाभिमानी आघाडी आणि विरोधी महाडिक आघाडी अशी थेट दुरंगी लढत होत आहे. सरपंचपदासाठी शाहू आघाडीकडून माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली खवरे, तर महाडिक आघाडीकडून पद्मजा करपे रिंगणात होत्या. यामुळं पुन्हा एकदा खवरे-करपे यांच्यात तुल्यबळ सामना झाला.

Shiroli Gram Panchayat
असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

ग्रामपंचायतमधील सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी महाडिक आघाडीनं प्रतिष्ठा पणाला लावली होती. शिरोली ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांचं हे होम ग्राऊंड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kausadi Gram Panchayat
Dhananjay Mahadik
SIR final voter list date Maharashtra
MSEDCL Electricity Bill Shock in Asurde Meter Not Working Yet Rs 48000 Bill Issued Gram Panchayat Demands Immediate Action
Marathi News Esakal
www.esakal.com