विधान परिषद रणधुमाळी; आता ठरणार अमल महाडिकांची रणनीती

सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे.
amal mahadik
amal mahadikesakal
Summary

सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे.

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार माजी आमदार अमल महाडिक यांची पुढील रणनीती आज निश्‍चित होणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी पाचच्या सुमारास कोल्हापुरात भाजप आणि मित्रपक्षांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. तेथे उमेदवारी अर्ज केव्हा भरायचा, सोबत कोण कोण असणार याबाबतचे निर्णय होण्याची शक्यता आहे. साधारण सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्‍वसनीय वृत्तांकडून सांगण्यात आले.

amal mahadik
डिसेंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा

भाजपकडून अमल महाडिक यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यानंतर मतदार भेटीची मोहीम सुरू झाली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह महाडिक कुटुंबीयांसह कार्यकर्त्यांनी मतदार आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. नेत्यांच्या भेटीबरोबरच मतदारांना भेटून मतदानाचे आवाहन केले जात आहे. आजही बॅक ऑफिसमधून पुढील रणनीती आखण्याचे काम सुरू होते. चंदगडपासून शिरोळपर्यंत सर्वत्र मतदारांना थेट भेटून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असणार आहेत. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या मित्रपक्षीय नेत्यांची बैठक होईल. कोल्हापुरातच होणाऱ्या बैठकीत उमेदवारी अर्ज केव्हा भरणार हे निश्‍चित होईल. तसेच पुढील रणनीती तेथेच ठरणार आहे. त्यामुळे बैठक महत्वाची असणार आहे. इचलकरंजीतील प्रमुख नेत्यांचा यामध्ये समावेश असणार अल्याचे समजते.

amal mahadik
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या; कास्ट सर्टिफिकेटची होणार पडताळणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com