Kolhapur Drought Survey : राज्यात दुष्काळाचा विळखा वाढला! आणखी चार तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; कोल्हापूरच्या 'या' 4 तालुक्यांचे तातडीने होणार सर्वेक्षण, मंत्री बावनकुळेंच्या सूचना

Maharashtra drought affected talukas 2026 : महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०८ वर पोहोचली आहे. कोल्हापूरमधील हातकणंगले, गडहिंग्लज, कागल आणि करवीर तालुक्यांचे सर्वेक्षण करून पीक पंचनाम्यांचे अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
Ground Survey Ordered in Four Kolhapur Talukas

Ground Survey Ordered in Four Kolhapur Talukas

esakal

Updated on: 

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, राज्य सरकारने मंगळवारी आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०४ वरून ३०८ वर पोहोचली आहे. याशिवाय आणखी नऊ तालुक्यांचे ग्राउंड सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज, करवीर, कागल या तालुक्यांचा समावेश आहे. याचा अहवाल तातडीने पाठवा, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली (Kolhapur drought survey latest update) आहे.

Loading content, please wait...