

Maharashtra News Moneylender Harassment Alleged After Man Sends Emotional Message To Wife And Dies Amid Debt Pressure
sakal
मुरगूड : ‘सविता, तू माझ्यासाठी भरपूर केलंस; पण मी काही करू शकलो नाही, मला माफ कर... ’ अशी शेवटची भावनिक साद घालत कागल तालुक्यातील सोनगे येथील श्रीधर दत्तात्रय डावरे (वय ४७) याने आत्महत्या केली. दरम्यान, खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याची तक्रार डवरे यांच्या पत्नीने पोलिसांत केली.