esakal | कोल्हापूरात ‘गरबा नाईट्‌स’ रंगणार
sakal

बोलून बातमी शोधा

garba.jpg

कोल्हापूरात ‘गरबा नाईट्‌स’ रंगणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वांनाच आता गरबा, रास दांडियाचे वेध लागले आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे गरबा नृत्य, दांडियास मुकलेली तरुणाई यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळण्यास उत्सुक आहे. यंदा ऐन नवरात्रोत्सवापूर्वीच कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने शासनाकडून रास दांडिया, गरबा आयोजनास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील अनेक मंडळांनी दुर्गामूर्तीसमोर दांडियाच्या आयोजनाच्या तयारीला सुवात केली आहे. दरम्यान, विविध संस्था - संघटनांकडून नवरात्रोत्सवापूर्वीच दांडिया - गरबा प्रशिक्षण कार्यशाळाही घेतल्या जात आहेत.

बाजारपेठेतही दांडिया नृत्यासाठी घागरा, चुनरी, टिपऱ्यांसह ऑक्साईड दागिन्यांना पसंती आहे. बाजारपेठ अनेक वस्तू व साहित्यांनी कलरफुल झाली आहे. मुलींच्या ड्रेसमध्ये घागरा-चोलीला मोठी मागणी आहे. यामध्ये बांधणी, कॉटन बेसवर आबलावर्क, जरदोजी वर्कसह लटकन, कुंदन लावलेल्या लाल, पिवळा, गुलाबी, केशरी रंगांच्या ओढण्यांना पसंती आहे. मुलांच्या ड्रेसमध्ये पारंपरिक राजस्थानी ड्रेसची चलती आहे. यामध्ये कुर्ता, धोती व फेटा असा सेट खरेदी केला जात आहे.

दांडियामध्येही विविध प्रकार

सजवलेल्या दांडियांना जास्त मागणी असल्याचे चित्र आहे. यामध्ये घुंगरू असलेले, लाकडी रंगवलेल्या पारंपरिक दांडिया, स्टीलच्या दांडिया व जरीने सजवलेल्या दांडियाच्या खरेदीकडे कल वाढला आहे. महाद्वार रोड, राजारामपुरी, जोतिबा रोड, बाजारगेट परिसरात विक्रीसाठी आलेल्या दांडियांनी नवरात्रीची चाहूल गडद केली आहे.

गेल्या वर्षी दांडिया, गरबाचे कार्यक्रम कोरोनामुळे रद्द केले होते. यंदा परवानगी दिल्याने दांडिया-गरब्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी होणार आहेत. त्याची तयारीही सुरू असून, अनेक ठिकाणी कार्यशाळाही सुरू आहेत. यंदा पुन्हा गरबा-दांडियाला उत्साह येईल, अशी आशा आहे.

- शेफाली मेहता, दांडिया प्रशिक्षिका

loading image
go to top