Prakash Ambedkar
esakal
कोल्हापूर : राज्यात मंत्री गायब होत असतील, तर जनतेने काय करायचे? माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना पोलिसांनीच पळवले. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपवलेले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. कायद्याचा अपमान होणार नाही, याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.