
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा वेळापत्रकाबाबत अनिश्चितता कायम.
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights):
एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखांतील वारंवार बदलामुळे परीक्षार्थी त्रस्त — आयोगाच्या संभाव्य वेळापत्रकावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.
पूर्वपरीक्षेच्या निकालात विलंब आणि न्यायालयीन खटल्यांमुळे मुख्य परीक्षा व नियुक्त्या पुढे ढकलल्या जात आहेत.
गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर — परीक्षा नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान होणार.
Maharashtra MPSC Student : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर होणाऱ्या परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकांत अनिश्चितता प्रकर्षाने दिसून येते. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पुढील वर्षाचे जाहीर होणारे वेळापत्रक परीक्षार्थींच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार घडतो. याउलट केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा नियोजित तारखांनुसारच होतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षांच्या बदलत्या तारखा परीक्षार्थींसाठी डोकेदुखी ठरतात.