

Maharashtra Rain Alert Bay of Bengal Weather System
esakal
Bay of Bengal Weather System : महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील मिळून सुमारे २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.