esakal | कोल्हापुरात मुलींनी मारली बाजी; 278 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result Maharashtra

कोल्हापुरात मुलींनी मारली बाजी; 278 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : अंतर्गत मूल्यमापनाद्वारे झालेल्या दहावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९९.९२ टक्के लागला असून, उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.२८ टक्के इतकी निकालात वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागातील सातारा जिल्ह्यातील मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण शंभर टक्के आहे, तर राज्यात कोल्हापूर विभागाचा निकाल आठव्या स्थानावर आहे. दरम्यान, यंदा पुन्हा कोकण विभागाने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असून, या विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. (maharashtra-state-board-ssc-kolhapur-sangli-satara-result-2021-akb84)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नववी व दहावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले. त्याद्वारे त्यांचा निकाल तयार करण्यात आला. एकूणच विद्यार्थ्यांसह पालक वर्गात निकालाबाबत उत्सुकता होती. आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण पसरले. कोल्हापूर विभागात एकूण २७८ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आले आहे. हे विद्यार्थी रिपीटर असून यातील ८१ विद्यार्थ्यांची माहिती मंडळाकडून मागविण्यात आली आहे. ती आल्यानंतर राखीव निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

कोल्हापूर विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी अशी

सातारा - ९९.९२

सांगली - ९९.९४

कोल्हापूर - ९९.९२

loading image