Teacher Recruitment
esakal
कोल्हापूर : शिक्षक समायोजनाबाबत (Teacher Recruitment) संघटनांनी दाखल केलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. त्यामुळे राज्याच्या शिक्षण संचालकांनी सुधारित संचमान्यता निकषानुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या संचमान्यता निकषानुसार राज्यात सुमारे २० हजार शिक्षक पदे कमी होणार आहेत. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन होईल; परंतु भविष्यात शिक्षक पदे कमी होतील व शिक्षक भरती होण्याची शक्यता कमी आहे.