Maharashtra Weather Alert : ऐन हिवाळ्यात पावसाळा, कमी दाबाचा पट्टा निर्माण; थंडी गायब होऊन पाऊस वाढणार...

IMD Weather Forecast : ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण होणार असून कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने थंडी कमी होऊन पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.
Unseasonal Winter Rain Likely as Low Pressure Forms

Unseasonal Winter Rain Likely as Low Pressure Forms

esakal

Updated on

Unseasonal Rainfall In Winter : ऐन हिवाळ्यात आज रात्री कोल्हापूरला अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक सरीवर सरी कोसळल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मग्न झालेल्या नेते, कार्यकर्त्यांची धावपळ झाली. ऐन थंडीत हवामान खात्याने राज्यात तुरळक स्वरूपात अवकाळी पावसाचा अंदाज दिला होता. श्रीलंका आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाल्याचे जाणविले. रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com