

Mahayuti Meeting On Gokul Election Seats Ends Without Consensus As Parties Seek Share Based On Their Strength
sakal
कोल्हापूर: ठरावाची खातरजमा करूनच गोकुळच्या जागा वाटपाचे महायुतीचे सूत्र केवळ फार्स ठरले. बहुतांश सर्वच तालुक्यांतील ठराव हे तिन्ही पक्षांकडे असल्याचे आज झालेल्या बैठकीतून दिसले. यातून महायुतीमधील अंतर्गत वाद वाढत गेले. अखेर ठरावांची खातरजमा करणे थांबवून पक्षनिहाय जागा वाटप करावे. जागा वाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवून अंतिम निर्णय त्यांनी घ्यावा, असे महायुतीमधील नेत्यांनी ठरवले.