

कोल्हापूर : महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलासाठी उद्या (ता. १९) प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. त्यामध्ये साधारण प्रत्येक पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा होणार आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत.