

Majgaon Ghat Neglect
sakal
माजगाव: माजगाव (ता. पन्हाळा) येथील कासारी नदीवरील घाटाच्या आजूबाजूला वाढलेली झुडपे आणि महापुरात वाहून आलेला गाळ साचल्यामुळे घाटाची दुरवस्था झाली आहे. घाटाच्या दुरवस्थेमुळे परिसरातील अनेक गावांच्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. माजगाव ग्रामपंचायतीने गाळ व झुडपे हटवून घाटाची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.