
सकाळी ११.०० - एका मंडळाकडून वर्धापन दिनाचा फलक उभारला
११.३० - साउंड सिस्टीम उभारून रस्ता अडवण्याचा प्रयत्न
१२.०० - सिद्धार्थनगर परिसरातील नागरिक लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल
१.०० - पोलिसांनी सिस्टीमसह साहित्य घेतले ताब्यात
सायंकाळी ६.०० - वर्धापन दिनाची पुन्हा तयारी सुरू
७.०० - नव्याने तीन फलक उभारले
रात्री ९.०० - साउंड सिस्टीम लावून फटाक्यांची आतषबाजी
९.३० - दोन गट एकमेका समोर येऊन दगडफेकीला सुरुवात
१०.०० वाहनांची तोडफोडसह पेटवण्याचा प्रकार
१०.१५ - पोलिस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल
११.०० पोलिसांचा जमावाशी संवाद
११.३० परिस्थिती नियंत्रणात
Kolhapur Suddharth Nagar Violence News : सिद्धार्थनगर कमानीसमोर लावलेला फलक व झेंड्यावरून दोन गटांत आज रात्री तुफान राडा झाला. दोन्ही गट हत्यारांसह एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूंनी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह सात जण जखमी झाले. प्रचंड गोंधळ, आरडाओरडा आणि त्यातच वीज खंडित झाल्याने गदारोळ उडाला. या चौकातील झेंडा फाडल्याच्या अफवेने या गोंधळात आणखी भर पडली. लक्ष्मीपुरी पोलिसांचा अपुरा पोलिस फाटा दोन्ही जमावांमध्ये अडकला. तीन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.