
सांगली पोलिस कॅन्टीनमध्ये तब्बल ७४ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर
esakal
Sangli Crime News : सांगली पोलिसांना किराणा माल, साहित्य, वस्तू स्वस्त दरात मिळाव्यात यासाठी दहा वर्षांपूर्वी पोलिसांसाठी सुरू केलेल्या ‘संस्कृती सबसिडीअर कॅन्टीन’मध्ये ७४ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कॅन्टीन व्यवस्थापक, हवालदार भूपेश चांदणे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.