

Kolhapur Burglary
कोल्हापूर: आर. के. नगरातील एकता कॉलनीतील बंद घराचे कुलूप उचकटून २० लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. १७ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपये याचा त्यामध्ये समावेश आहे. दीपकराव जयसिंगराव भोसले (वय ७३) यांनी याबाबत करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी शनिवारी पहाटेच चोरी केली असून, घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशाही बदलल्याचे समोर आले.