60-year-old Maya Kulkarni body found in Male village lake
esakal
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील गाव तलावामध्ये माया अशोक कुलकर्णी (वय ६०) या महिलेचा मृतदेह (Maya Kulkarni death) आढळला. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी (ता. ३) सकाळी ८.३० पूर्वी गावतलावामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. तो माया कुलकर्णी (रा. माले ता. पन्हाळा) यांचा असल्याचे खात्रीशीर स्पष्ट झाले.