
Man Kills Close Friend
esakal
Kolhapur Killing Case : हनुमाननगरातील रिक्षाचालक मोहन पोवार यांचा खून केल्यानंतर संशयित चंद्रकांत शेळके (वय ७३, रा. देवकर पाणंद) याचा शर्ट रक्ताने माखला होता. बाहेर पडल्यानंतर कोणी पाहू नये, यासाठी त्याने पोवार यांच्या मुलाचा शर्ट अंगावर घातला होता. घराकडे जाताना रक्ताने माखलेला शर्ट ओढ्यात फेकला होता. जुना राजवाडा पोलिसांनी शुक्रवारी हा शर्ट जप्त केला. संशयित शेळके याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.