esakal | ब्रेकिंग-चिमुकल्यांसह पत्नीला विष देवून एकाची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

man suicide with family in goa

तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शाहू सतूराम धुमाळे (वय 41) याने पत्नी व दोन चिमुकल्यांसह गोव्यातील म्हापसा येथे आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेने गडहिंग्लज तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ब्रेकिंग-चिमुकल्यांसह पत्नीला विष देवून एकाची आत्महत्या
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेसरी (कोल्हापूर) : तावरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शाहू सतूराम धुमाळे (वय 41) याने पत्नी व दोन चिमुकल्यांसह गोव्यातील म्हापसा येथे आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेने गडहिंग्लज तालुक्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पत्नी कविता धुमाळे (34) मुलगा पारस (वय 9) व साईराज (वय 3) यांचाही आत्महत्या केलेल्यात समावेश आहे. गोव्यातील म्हापसा येथील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. 

मूळचे तावरेवाडीतील शाहू धुमाळे कुटूंबासह गेल्या पंधरा वर्षापासून कामानिमित्त म्हापसामधील खोर्ली येथे वास्तव्यास होते. बहिण व काही नातेवाईक गोव्यातच भाजीपाल्याचा व्यापार करत असल्याचे सांगण्यात येते. शाहूने अनेक ठिकाणाहून हात उसने पैसे व कर्ज घेतल्याची चर्चा आहे. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. 

हे पण वाचा -  मंत्री सतेज पाटील यांनी दिले आदेश आणि त्यांना मिळाले घर 

घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी धुमाळे कुटूंबिय राहत असलेल्या खोर्ली गावात पोहचले. शाहु धुमाळे हा फ्लॅटच्या हॉलमध्ये पंख्याला लटकलेला आढळला तर पत्नी कवितासह दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरूममध्ये कॉटवर आढळले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. पहिल्यांदा पत्नी व मुलांना विष देवून नंतर शाहूने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे. 

हे पण वाचा - दुर्दैवी, खेळता खेळता चिमुकली ट्रकखाली आली आणि... 

घटनेची महिती तावरेवाडी गावात समजताच हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुंटूबातील चौघांच्या आत्महत्येने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गावी शाहूचे आई-वडील, भाऊ, भावजय असतात. एक बहिण मुंबईला तर एक गोव्यातच असते. आई-वडील वृद्ध असल्याने या घटनेची माहिती रात्री उशिरापर्यंत त्यांना देण्यात आली नव्हती. गावात शांतता होती. परिसरात या घटनेचीच चर्चा सुरू होती. आत्महत्येच्या घटनेची माहिती समजताच शाहूचा पुतण्या सुशांत व इतर नातेवाईक म्हापसाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. उद्या दुपारपर्यंत त्यांचे मृतदेह गावी आणण्यात येणार असल्याचे सांगितले.