
लुमाकांत नलवडे
कोल्हापूर : शहरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह प्रमुख ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. येथील सुरक्षा आणि गैरकारभार टाळण्यासाठी सर्वच पार्किंगच्या ठिकणी ‘फास्टटॅग’ यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक पार्किंगमध्ये किती वाहने येतात, किती वेळ थांबतात. त्यांची इत्यंभुत माहिती नोंद होते. चोर, गुन्हेगार पकडले जाऊ शकतात. यातून धोका टाळला जाऊ शकतो आणि गैरकारभाराला आळा बसू शकतो.