

कोल्हापुरातील 'या' गावाने थेट संरपंचांविरोधात अविश्वास ठरावासाठी केलं मतदान
esakal
Kolhapur : (पंडित सावंत): मांडुकली (ता. गगनबावडा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच यांचेविरुध्द अविश्वास ठरावासंदर्भात आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत मतदानासाठी नोंदणी झाली असून या नोंदणी प्रक्रियेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ११ नंतर प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अध्यासी अधिकारी म्हणून गगनबावड्याच्या गटविकास अधिकारी अलमास सय्यद ह्या काम पाहत आहेत.