

Mango Price Akshaya Tritiya news
esakal
Alphonso mango price : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी यंदा वाशी येथील घाऊक बाजारात कोकणातील ६० हजार हापूस आंबापेट्यांची आवक झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी आवक असल्यामुळे दर वधारलेले आहेत. पाच ते सात डझनच्या पेटीला १५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे हापूसचे दर पुढील काही दिवस चढेच राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पुढच्या काही दिवसात दर कमी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.