

hapus Mango Price Drop
esakal
Hapus mango rates fall : कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या भावात काहीशी घसरण झाली आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या अक्षय तृतीयेसाठी बाजारात आंब्याची आवक वाढली आहे.