Mango Production : जिल्ह्यात आंबा उत्पादन 938 हेक्टरने घटले; पाच वर्षांत 2606 हेक्टर क्षेत्र झाले कमी

बेळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादन (Mango Production) मागील वर्षभरात ९३८ हेक्टरने घटले आहे.
Mango Production
Mango Productionesakal
Summary

आंबा उत्पादनाची ही घटलेली आकडेवारी पाहता यावर्षी त्यात घट होण्याची शक्यता आहे.‌ बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातून वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगड येथून हापूस आंब्याची आवक होते.

बेळगाव : जिल्ह्यातील आंबा उत्पादन (Mango Production) मागील वर्षभरात ९३८ हेक्टरने घटले आहे. मागील पाच वर्षांत सातत्याने ही घट होत असून, उत्पादन क्षेत्र घटत असल्याने रोजगार हमी योजनेची त्यासाठी आता मदत घेतली जाऊ लागली आहे. पाच वर्षांत आंबा उत्पादन क्षेत्र २,६०६ हेक्टरने कमी झाले आहे.

Mango Production
सांगली, तासगावला चार दिवसांनंतर बेदाणा सौदे पूर्ववत; अडत्यांची मोठी रक्कम अडकली, शेतकरी संकटात

उत्तर कर्नाटकात आंबा उत्पादनात यापूर्वी बेळगाव जिल्हा आघाडीवर होता. पण, बाजारपेठ, मजूर न मिळणे, अपेक्षित उत्पादन न मिळणे यामुळे बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) आंब्याची लागवड सोडून व्यापारी पीक असलेल्या उसाच्या लागवडीकडे वळले आहेत. मागील दोन वर्षांत लाखाहून अधिक आंब्याची झाडे तोडली आहेत. यामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे.

Mango Production
Sangli Lok Sabha : महायुती भक्कम, 'मविआ'मध्ये फूट; दोन्ही आघाड्यांतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते मनापासून पाळणार का?

२०१९ पासून आंबा बागायती नष्ट करून अनेक ठिकाणी इतर पिकांकडे शेतकरी वळल्याचे दिसून येत आहे. देशात इतर ठिकाणी एकरी ३० ते ४० टन आंब्याचे उत्पादन मिळत असताना जिल्ह्यात मात्र केवळ पाच ते सहा टन उत्पादन मिळणे एक प्रमुख कारण ठरले आहे. २०१४ ते २०१८ कालावधीत प्रत्येक वर्षी जिल्ह्यात ५,४६५ हेक्टर प्रदेशात सरासरी ७७,५८० टन आंब्याचे उत्पादन मिळत होते. पण, २०१९ पासून अलीकडच्या काळात उत्पादन क्षेत्र घटल्याने ५२ हजार टन आंबा उत्पादित होत आहे.

आंबा उत्पादनाची ही घटलेली आकडेवारी पाहता यावर्षी त्यात घट होण्याची शक्यता आहे.‌ बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रातून वेंगुर्ला, रत्नागिरी, देवगड येथून हापूस आंब्याची आवक होते. तर बंगळूर, चेन्नई येथून तोतापुरी, नीलम आणि इतर प्रकारच्या आंब्यांची आवक होते. राज्यात कोलार, चिकबळ्ळापूर, बंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यात आंबा उत्पादन घेतले जाते. तर त्या पाठोपाठ बेळगाव, चित्रदुर्ग, दावणगिरी, हावेरी, धारवाड, बिदर, चिकमंगळूर, शिमोगा भागातील निवडक ठिकाणी आंब्याची लागवड केली जाते.

Mango Production
Monsoon Season : वादळ, विजांचा धोका वेळीच ओळखा; शेतशिवारात जाणे, झाडाखाली थांबणे टाळा

‘फलोत्पादन’कडून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन घटत आहे. लागवडीचे क्षेत्रही घटत असल्याने फलोत्पादन खात्याकडून आंबा लागवड क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात आहे. आंब्यावर पडणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना दिली जात असून, आंबा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जात आहे. यांसह रोजगार हमी योजनेतून हे क्षेत्र वाढविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून आंब्याची रोपे जिल्ह्यात ठिकठिकाणी लावली जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com