Maratha Reservation : मराठा आरक्षणप्रश्नी चालढकल करणाऱ्यांना धडा शिकवणार; जरांगे-पाटलांच्या आदेशाची प्रतीक्षा

मराठा आरक्षण (Maratha Reservation) चळवळीचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil
Maratha Reservation Case Manoj Jarange-Patilesakal
Summary

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाची आहे. परंतु सरकारने स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली आहे.'

कोल्हापूर : सरकारने मराठा समाजाला (Maratha Community) ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) न देता स्वतंत्रपणे दिलेले आरक्षण सकल मराठा समाजाला मान्य नाही. त्यामुळे मराठवाड्यात मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अर्ज भरुन रोष व्यक्त करण्याची भूमिका घेतली आहे. याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजही ‘दे धक्का’ देण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षणासाठी चालढकल करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना धडा शिकवूया, असा सूर उमटत आहे.

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil
Sangli Loksabha : ठाकरेंचा ‘शब्द’, काँग्रेसला ‘कोडे’; सांगलीचा तिढा सुटणार कसा? चंद्रहारच्या घोषणेनंतर ठिणग्या

मराठा आरक्षण (Maratha Reservation) चळवळीचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पुढील दिशा निश्‍चित होणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे, अशी प्रमुख मागणी आहे. परंतु सरकारने ही मागणी मान्य न करता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी पुन्हा आंदोलन तीव्र केले आहे.

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil
गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर आज निर्णय; अमित शहा करणार शिक्कामोर्तब!

सरकारने फसवणूक केली आहे, या भावनेतून लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांचे अर्ज भरण्याची भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. त्यानुसार मराठवाड्यात जोरदार तयारी सुरु आहे. हे लोण राज्यभर पसरत चालले आहे. विविध आंदोलनातून दिशा देणारे कोल्हापूरही यामध्ये मागे नाही.

येथील सकल मराठा समाजही आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका न घेतलेल्या लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांना जागा दाखविण्याची हीच वेळ आहे, अशा भावना व्यक्त होत आहेत. स्वत:ला मराठा समाजाचे आहोत, असे सांगणारे लोकप्रतिनिधी आरक्षणावेळी सोयीची भूमिका घेतात, त्यामुळेच हा विषय लटकल्याची भावना समाजाची आहे.

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil
कोल्हापूर लोकसभेसाठी समरजित घाटगेंचे नाव आजपर्यंत माझ्या कानावर आले नाही; काय म्हणाले मुश्रीफ?

‘मराठा आरक्षण आंदोलन व निवडणुका हे दोन स्वतंत्र विषय आहेत. आरक्षण आंदोलनात आम्ही जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे आहोत. परंतु निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासाठी सकारात्मक भूमिका घेऊन समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तीला पाठींबा दिला जाईल. त्याचबरोबर समाजाला फसविणाऱ्यांना धडा शिकविला जाईल.

-चंद्रकांत पाटील, समन्वयक

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil
Kolhapur Loksabha : '..म्हणून कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असं चालत नाही’; सतेज पाटलांचा थेट निशाणा

‘मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाची आहे. परंतु सरकारने स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत समाजाची फसवणूक करणाऱ्यांना सकल मराठा समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

-ॲड. बाबा इंदुलकर, समन्वयक

‘कोल्हापूरचा सकल मराठा समाज हा जरांगे-पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील भूमिकेबाबत निर्णय होणार आहे. त्यानंतर कोल्हापुरात बैठक घेऊन पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे.

-वसंतराव मुळीक, समन्वयक, सकल मराठा समाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com