
MP Shahu Maharaj
esakal
कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र होणार आहे. आज कोल्हापूरात आंदोलनाचे शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट आणि पेनचे पूजन करण्यात आले. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते हे पूजन पार पडले. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे देखील उपस्थित होते. कोल्हापूरातील ऐतिहासिक भवानी मंडपात हा कार्यक्रम संपन्न झाला.