

मराठी भाषिकांनी काळा दिन साजरा करत महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा वज्रनिर्धार केला.
esakal
क्षणचित्रे
साडेआठ वाजल्यापासून संभाजी चौकात कार्यकर्ते येण्यास सुरू
दडपशाही करण्यासाठी सकाळपासूनच पोलिसांची कुमक तैनात.
काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करून कार्यकर्ते सहभागी.
महिला आणि तरुणींचाही मोठा सहभाग.
फेरीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याचे वाटप.
निषेध फेरी पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी.
संयुक्त महाराष्ट्रसह केंद्राविरोधात घोषणाबाजी.
फेरीवेळी महात्मा फुले रोड परिसरात पावसाची हजेरी.
निषेध फेरीत घुसण्याचा कन्नड संघटनांचा प्रयत्न.
युवकांचा सहभाग उत्साह वाढविणारा.
Karnataka Maharashtra Dispute : कर्नाटक प्रशासनाची दडपशाही झुगारून हजारो मराठी भाषकांनी काळा दिनाच्या निषेध फेरीत सहभागी होऊन महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार केला आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाच्या फेरीत आबालवृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी चौथी पिढीही सज्ज असल्याचे दाखवून दिले. फेरीमध्ये हजारो मराठी भाषक सहभागी झाल्यामुळे सर्वत्र मराठी भाषकांच्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला. युवा पिढीत महाराष्ट्रात जाण्यासाठीची जिद्दही दिसून येत होती.