esakal | हृदयद्रावक: तीन वर्षांच्या मुलीसह आईने केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

water

हृदयद्रावक: तीन वर्षांच्या मुलीसह आईने केली आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील एका विवाहितेने तीन वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गांधीनगर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. सौ. तेजस्विनी किरण मोरे (वय २४) व अक्षरा (३) अशी मायलेकींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी

सौ. तेजस्विनी कौटुंबिक वादातून माहेरी गडमुडशिंगी येथे वास्तव्यास आली होती. ती बुधवारी (ता.१४) सकाळी छोट्या मुलीसह घरातून बाहेर पडली. आज दुपारी त्या दोघींचा मृतदेह त्यांच्या घरातील विहिरीत तरंगताना आढळला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. गडमुडशिंगी मेथी दाजी नामदेव गिरुले यांची तेजस्विनी मुलगी आहे. तिचा विवाह चार वर्षांपूर्वी वसगडे येथील किरण मोरे यांच्याशी झाला होता.

मुलगी झाल्यानंतर कौटुंबिक वादाला सुरवात झाली. त्यातून दोन वर्षांपासून तेजस्विनी मुलीसह गडमुडशिंगी येथे वडिलांकडे राहत होती. पोटगी दावाही दाखल झाला होता. या सर्व प्रकारामुळे तेजस्विनी नैराश्‍यात होती. ती मुलगी अक्षराला घेऊन बुधवारी सकाळी साडेअकराला घरातून कोणालाही न सांगता बाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध केली. त्यानंतर कुटुंबीयांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात ती मुलीसह बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

हेही वाचा- पाण्यापायी बोटं झाली वाकडी अन्‌ सांधेदुखीनं ग्रासलं!

दरम्यान, आज दुपारी तीन वाजता त्यांच्या विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना दिसून आले. गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Edited By- Archana Banage