
जिल्ह्यात मटक्याचा धंदा जोमात फोफावला आहे. मटका, ऑनलाईन जुगारासह कॅसिनोनेही एन्ट्री केली आहे. अवैध धंद्याचे मूळ मालक दिमाखात वावरत आहेत. मुंबई मटक्याला काही काळ ब्रेक लागल्याने ‘मेन बाजार’ हा नवा प्रकार आणून मटक्याच्या आहारी गेलेल्यांना पुन्हा भिकेला लावण्याचा धंदा सुरूच आहे. यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका...
कोल्हापूर : मुंबई मटक्याला पर्याय म्हणून गोव्यात ‘मेन बाजार’ हा नवा प्रकार सुरू झाला. गोव्यातून सूत्रे हलविणाऱ्या ‘शेट्टी’ मालकाची मर्जी राखण्यासाठी कोल्हापुरात अनेक जण सरसावले. ‘सम्राट’ सोबतच पसार झालेल्या ‘पप्पूच्या’ भाच्यानेही यात उडी घेतली आहे. कोल्हापुरात एकेकाळचा मटका मालक ‘अभी’ सध्या सर्वकाही ‘हॅण्डल’ करण्याचा नावाखाली रुबाब करतो आहे.