कोल्हापूर : कसबा सांगाव (ता. कागल) येथे महिला होमगार्डने भाडे तत्त्वावर दिलेल्या खोलीतच मटका सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कागल पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कसबा सांगावमध्ये या खोलीवर छापा टाकून सिकंदर कांबळे (रा. कसबा सांगाव) याला ताब्यात घेतले. रोख १७०० रुपये, मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. तो मालक सतीश भिंगारे याच्यासाठी मटका घेत होता. यासह शहरातील शिवाजी पेठ, वडणगे याठिकाणीही मटका अड्ड्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.