

city governance
sakal
कोल्हापूर : मिळकत चार कोटींची, खर्च दुप्पट हा काय प्रकार आहे? वाट लावली आहे. तोट्याचाच कारभार करणार असाल आणि मिळकत वाढवत नसाल, तर अधिकाऱ्यांचेही पगार निघणार नाहीत. उत्पन्न आणा, मगच पगार होईल, असा इशारा महापौर रूपाराणी निकम यांनी आज दिला. जे करायचे आहे, ते अधिकाऱ्यांनाच करायचे आहे. नगरसेवक तुमच्या मदतीसाठी आहेत, हे विसरून आम्हाला कामाला ठेवल्यासारखे वागत आहात, गैरफायदा घेऊ नका, असे अधिकाऱ्यांना ठणकावले.