

Suspects Arrested
sakal
इचलकरंजी : एमडी ड्रग्ज प्रकरणात साडेचार महिन्यांपासून पसार असलेल्या तिघांना शहापूर पोलिसांनी अटक केली. संतोष शिवसागर केसरवानी (वय २८, रा. सुर्वेनगर) पियूष विजय भंडारे (२१, समाज मंदिरमागे, शहापूर), रेहान रफिक महावत (२८, तोरणानगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना एक दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.