सामानगडावर ओल्या पार्ट्यांचे पेव

Meals, Plastic Items, Liquor Bottles Are Scattered All Over The Fort Samangad Kolhapur Marathi News
Meals, Plastic Items, Liquor Bottles Are Scattered All Over The Fort Samangad Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : तालुक्‍यातील ऐतिहासिक किल्ले सामानगडावर काही महिन्यांपासून ओल्या पार्ट्यांचे पेव फुटले आहे. जेवणाच्या पत्रावळ्या, प्लास्टिक साहित्य, दारूच्या बाटल्या इतस्तत: विखुरलेल्या दिसत असून या प्रकाराने सहा वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या स्वच्छता व किल्ला संवर्धन मोहिमेत अडथळा येत आहे. यामुळे संतापलेल्या इतिहासप्रेमींनी गडहिंग्लज पोलिसांचे लक्ष वेधून संबंधितावर कारवाईची मागणी केली आहे. 

स्व. बाबा कुपेकर विधानसभा अध्यक्ष असताना किल्ला संवर्धनासाठी दहा कोटींचा निधी मिळाला. त्यातून अनेक विकासकामे आणि ऐतिहासिक ठिकाणांचे संवर्धन झाले. काही कालावधीनंतर किल्ल्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष होवू लागले. पार्ट्या आणि प्रेमी युगूलांनी उच्छाद मांडला. परिणामी किल्ल्याचे पावित्र्य धोक्‍यात येवू लागले. दरम्यान, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी किल्ल्याची ही परिस्थिती बदलण्याचा निश्‍चय केला.

आठवड्यातून रविवारी सुट्टी दिवशी किल्ला संवर्धनाची मोहिम सुरू झाली. बघता बघता स्थानिक पातळीवर असंख्य कार्यकर्ते यात सहभागी झाले अन्‌ किल्ल्याचे रूपडे पालटून गेले. स्वच्छता झाली. ऐतिहासिक ठिकाणांचे संवर्धन केले गेले. विशेष म्हणजे जे अशक्‍यप्राय होते त्या सात कमान विहिरीतील गाळ काढून पर्यटकांना पाहण्यासाठी खुले करून दिले. ही सर्व कामे या प्रतिष्ठानने पुरातत्व विभागाच्या परवानगीने केली आहेत. विशेषत: किल्ल्यासाठी एक गडपाल नेमून या प्रतिष्ठानने किल्ल्यावर होणारे अवैध प्रकारांना आळा घालण्यात यशही मिळविले. 

दरम्यान, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या किल्ल्यांवर मद्यपींची वर्दळ वाढली. जंगल परिसरात जेवणावळ्या उठू लागल्या. हळूहळू किल्ल्याला पुन्हा भकास स्वरूप येवू लागले. दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांना हा प्रकार लक्षात आला. या प्रकारांमुळे ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान आणि गडप्रेमी, शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत.

यामुळे पोलिसांनी कडक कारवाईचे पाऊल उचलावे, अशी मागणी दुर्गवीर प्रतिष्ठानने पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसूरकर, तालुकाध्यक्ष कैलास परीट, रेस्क्‍यू कोर्सचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भोसले, गडपाल सतीश चव्हाण, अवधूत यडूरकर, बाळासाहेब कोरे, निखिल पाटील, अभिषेक पाटील, विश्‍वराज भोसले यांच्या शिष्टमंडळाने या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे. 

कार्यकर्त्यांशी हुज्जत 
या प्रकारामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. शांतपणे विरोध करणाऱ्या या कार्यकर्त्यांशीच मद्यपी आणि पार्ट्या करणाऱ्याकडून हुज्जत घालण्याचे प्रकार घडत आहेत. गडावर काम करण्याचा अधिकार कोणी दिला, असे प्रश्‍न विचारून कामात अडथळा आणत असल्याची तक्रारही दुर्गवीर प्रतिष्ठानने निवेदनातून केली आहे. 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com