esakal | मेघोली Impact: वेदगंगेच्या पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

मेघोली Impact: वेदगंगेच्या पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ

वेदगंगा नदीची पाण्याची पातळी ५ फुटांनी वाढली. तर कांही ठिकाणी नदीकाठ गाळाने भरला आहे.

मेघोली Impact: वेदगंगेच्या पाणी पातळीत 5 फुटांनी वाढ

sakal_logo
By
अरविंद सुतार

कोनवडे (कोल्हापूर) : भुदरगड तालुक्यातील मेघोली (Megholi) पाटबंधारे प्रकल्प फुटल्याने वेदगंगा नदीची (Vedganga River)पाण्याची पातळी ५ फुटांनी वाढून पाण्याचा रंग रातोरात बदलून पाण्याला लाल रंग येऊन पाणी गढूळ झाले. हा प्रकल्प फुटल्याने कुर, कोनवडे परिसरासह वेदगंगा नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरणात हॊते.

म्हसवे : मेघोली प्रकल्प फुटल्याने वेदगंगा नदीचे पाणी गढूळ झाले.

म्हसवे : मेघोली प्रकल्प फुटल्याने वेदगंगा नदीचे पाणी गढूळ झाले.

बुधवारी रात्री १०. ३० च्या सुमारास मेघोली तलाव फुटल्याची बातमी सोशल मीडियावर धडकली आणि एकच गोंधळ वेदगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पसरला रात्री घटना घडल्याने अनर्थ टळला. मागील कांही दिवसांपूर्वीच पूर आल्याच्या घटना ताज्या असतानाच ही घटना घडल्याने नदीकाठच्या गावांना धडकीच भरली. सकाळच्या सुमारास पाण्याची स्थिती पाहण्यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांची पावले नदीकडे वळली. वेदगंगा नदीचे स्वच्छ पाणी पूर्णतः गढूळ होऊन पाण्याला लाल रंग आल्याचे दिसून आले.

हेही वाचा: दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव; तासात झालं होत्याचं नव्हतं

वेदगंगा नदीची पाण्याची पातळी ५ फुटांनी वाढली. तर कांही ठिकाणी नदीकाठ गाळाने भरला आहे. मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प फुटल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रकल्प फुटल्याने धडकी भरणारी ठरली. रात्री घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला हे मात्र निश्चित.

loading image
go to top