आठ दिवसांपूर्वी बाहेरच्या राज्यातील मजूर कुटुंबातील १२ वर्षीय मुलगी भांडी घासताना एकाने तिचा फोटो काढला होता.
गडहिंग्लज : आठ दिवसांपूर्वी परप्रांतीय कामगाराने केलेल्या १२ वर्षीय मुलीच्या विनयभंगाची बातमी काल शहरात पसरताच संतप्त जमावाने संबंधित कामगार काम करीत असलेल्या ठेकेदाराच्या दुकानावर हल्ला करून साहित्याची मोडतोड केली. दरम्यान, दोषीवर कारवाई करण्यासाठी संतप्त जमावाने पोलिस ठाण्यासमोर (Gadhinglaj Police) दोन तास ठाण मांडले. पोलिसांनी पीडितेच्या वडिलांची फिर्याद घेऊन दोघा परप्रांतीयावर गुन्हा दाखल केला.