
कोल्हापूर : गायीच्या दूध दरात गोकुळ दूध संघाने वारंवार कपात केली आहे. त्यामुळे दूध व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शासनाने जाहीर केलेले ७ टक्के अनुदानही बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. पशुखाद्याचे वाढलेले दर लक्षात घेऊन गायीच्या दूध दरात १० रुपयांनी वाढ करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, अशी मागणी जिल्हा दूध उत्पादक संघाने केली आहे. आज त्यांनी गायी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.