मुश्रीफ, घाटगे, मंडलिक म्हणजे अमर, अकबर, ऍन्थनी ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  

minister hasan mushrif criticism on bjp leader chandrakant patil
minister hasan mushrif criticism on bjp leader chandrakant patil
Updated on

कोल्हापूर : मी आणि शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक भाऊ-भाऊच आहोत. खासदार मंडलिक, संजयबाबा घाटगे आणि मी म्हणजे अमर, अकबर आणि ऍन्थनी आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघ (गोकुळ) निवडणुकीत जरा चढाओढ होईल पण आम्ही एकच आहोत. संजय मंडलिक आणि आपण 22 वर्ष तर संजयबाबा घाटगे आणि मी सहा विधानसभा निवडणुका एकत्र लढलो आहोत. पण, काही माणसं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घेवून आमच्या घरावर आयकरचा छापा टाक, ईडीचा छापा टाक, विधवा महिलांची पेन्शन रद्द करुन त्यांना टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत. असे आम्ही कधी करत नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघात अरूण लाड आणि जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते. 
श्री मुश्रीफ म्हणाले, संजय घाटगे, संजय मंडलिक आणि माझ्यात काही मतभेद झाले असतील. पण, एकमेकांची कधीही अडवणूक केलेली नाही. निवडणूक झाली की विषय संपला. अस समजून आम्ही काम केले. पण काही माणसं अशी तयार झाली आहेत की आमच्यावर कधी आयकर छापा टाकायला लावायचा, कधी ईडीचा छापा टाकायचा, तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांना घेवून विधवा महिलांची पेन्शन रद्द करुन त्यांना टाचा घासायला लावण्याचे काम करत आहेत. अे आम्ही कधीच केले नाही. भविष्यातही आम्ही तिघेही अमर, अकबर आणि ऍन्थनी कागल तालुक्‍याच्या विकासासाठी एकच राहणार असल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahabhumi Portal
Forest Department action in Dhangarwadi Kolhapur
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Krishnaraj Mahadik Rahul Gandhi statement in kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com